वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला सामिक्षातमक अभ्यास किंवा वैज्ञानिक चिकित्सा म्हणजे संशोधन होय”. “अभिनव वस्तुस्थिती पाहण्यासाठी हाती घेतलेले शोधकार्य म्हणजे संशोधन होय”. “संकलन व विश्लेषण करून त्यांचा अन्वयार्थ लावण्याची व्यवस्थाबद्ध प्रक्रिया म्हणजे संशोधन होय.
संशोधनाचे प्रकार
संशोधनाचे प्रकार याबद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे,
अ)उपयोजितेनुसार
उपयोजितेनुसार असणाऱ्या संशोधन पद्धतीत दोन प्रकारच्या संशोधनांचा समावेश होतो ते म्हणजे मुलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन.
1.मुलभूत संशोधन
मुलभूत संशोधनात सिध्दांत आणि तत्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो.
2.उपयोजित संशोधन
उपयोजित संशोधनात मुलभूत मानसशास्त्रीय तत्वाचे व सांखिकी तंत्राचे उपयोजन केले जाते.
ब) उद्धीष्टानुसार
1.वर्णनात्मक संशोधन
या संशोधनात कोणतेही नवीन सिध्दांत विकसित न करता आहे त्याच गोष्टी जाणून घेतले जातात.
2.स्पष्टीकरणात्मक/पूर्वकथनात्मक
या संशोधनात एखाद्या सामाजिक किवा आर्थिक स्थितीच्या संदर्भामध्ये अभ्यास करताना त्या पाठीमागचे पूर्ण कारणे शोधले जाते.
निदानात्मक
एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी व ते उत्तर शोधून त्यावर उपाययोजना सांगण्यासाठी हे संशोधन केले जाते.
3.सहसंबधीनिदर्शक
दोन किंवा त्यापेक्षा अधिक घटकांच्या संदर्भाने त्यातील परस्परसंबंध तपासून त्यात वाढ झाली कि घट झाली हे अभ्यासन्याठी हे संशोधन केले जाते.
क)साधनांच्या उपयोजनेनुसार
1. संख्यात्मक/सर्वेक्षण
ज्यावेळेला व्यक्ती अथवा घटकांविषयी संशोधन करायचे असते,त्यांची संख्या मोठी असते,अशा वेळेला सर्वेक्षण पद्धतीचा वापर केले जाते.
2.गुणात्मक
या संशोधनात संशोधक एखाद्या घटकाच्या संधर्भात गुणात्मक साधनांचा वापर करून संशोधन करतो. यात मुलाखत,चाचणी,निरीक्षण पद्धत, केस स्टडी अशा पध्दतींचा वापर केला जातो.
ड) स्थानानुसार
1. प्रयोगशालेय
प्रायोगिक पद्दतीत प्रयोग केला जातो,तसेच आधारसामग्री प्रयोगाद्वारे संकलित करण्यासाठी या पध्दतीचा उपयोग केला जातो.
2. नियंत्रित परीस्थितीतील / प्रयोगात्मक
या संशोधनात एखाद्या निश्चित योजना आणि प्रक्रिया ठरवून एखाद्या घटकाच्या संदर्भात संशोधन केले जाते.
3.स्वाभाविक परीस्थितीतील
या संशोधनात संशोधक समाजघटकाचा अभ्यास करताना त्या गटाचा आहे त्या स्थितीत कुठलीही नियंत्रणे न लादता अभ्यास करतो.
ड) क्षेत्रानुसार
1. ऐतिहासिक
या संशोधनात भूतकाळातील घटकांच्या संदर्भाने संशोधन केले जाते.
2.शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इ.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय इ.अशा विविध क्षेत्रानुसार संशोधन केले जाते.
संशोधन पद्धत
संशोधन करणे हे कोणत्याही शास्त्राचे ध्येय असते. संशोधन हि एक प्रक्रिया आहे. जिज्ञासा अथवा ज्ञान संपादन करणे ही माणसाची मुलभूत प्रवृत्ती आहे. त्यासाठी प्रत्येक घटनेबद्दल का, कसे व काय ह्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्या बुद्धीने शोधून काढतो व मिळवलेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करतो. परंतु ज्ञान अथवा तथ्ये प्राप्त करून घेणे म्हणजेच शास्त्र नव्हे, नुसत्या संग्रहित ज्ञानाला संशोधन म्हणत नाहीत तर हे ज्ञान अथवा कोणत्या तरी पद्दतीने व्यवस्थित रूपाने संग्रहित करावी लागतात.
सर्वेक्षण संशोधन पध्दती
सर्वेक्षण संशोधनाच्या पद्धतीत संशोधक परिस्थितीचे काळजीपूर्वक व काटेकोरपणे निरीक्षण करतो. सर्वेक्षण या शब्दामधुनच त्याची प्रचिती येते. तसेच कोणत्या गोष्टीचे सर्वेक्षण करावयाचे आहे हे नमूद केले जाते.
सर्वेक्षणामुळे विशिष्ट काळातील माहिती थोड्या वेळात कमी श्रमात व फार मोठ्या प्रमाणात संकलित करता येते. या पद्दतीत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांपेक्षा समूहाच्या वैशिष्ट्यांना महत्त्व आहे. जनप्रवाहाची प्रवृत्ती समजून घेणे या पद्दतीने शक्य आहे.
सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, स्पष्टीकरण आणि मूल्यमापन होय. सर्वेक्षणात निव्वळ माहिती संकलित करणे आणि पत्रके तयार करणे एवढ्या पुरते मर्यदित नाही तर यामध्ये मापन, वर्गीकरण, अर्थनिर्वचन आणि मुल्यांकन इ. समावेश होतो.
सर्वेक्षणातून तीन प्रकारची माहिती संकलित केली जाते.
वर्तमान स्थिती
अपेक्षित स्थिती
आवश्यक साधनांचा बोध
सर्वेक्षण पध्दतीची वैशिष्ट्ये
माहिती प्रश्नावलीच्या आधारे किंवा व्यक्तीच्या मुलाखती घेऊन थोड्या वेळात व कमी श्रमात संकलित करता येतात.
वेगवेगळ्या वयोगटाची व्यक्ती असल्याने वेगवेगळ्या वयोगटाची वर्तमान वैशिष्टे संकलित करता येतात.
सर्वेक्षण जनसंखेच्या वैशिष्ट्यांशी संबधित असते. जनप्रवाहाची प्रवृत्ती समजून घेणे हा सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू असतो
सर्वेक्षण हे गुणात्मक असते.तसेच संख्यात्मकही असते.
सर्वेक्षणात भाषेला महत्व आहे.
वर्तमान स्थिती समजून घेता येते.
संशोधनाची साधने
कोणत्याही प्रकारच्या संशोधनात तथ्य संकलनाकरिता संशोधन साधनांचा वापर ही महत्त्वपूर्ण बाब असते. संशोधनाशी संबधित गुणात्मक आणि संख्य्त्मक तथ्य अचूकपणे संकलित करण्याकरिता पुरेसे विश्वसनीय आणि वैध संशोधन साधन उपयोगात आणणे हे अचूक निष्कर्ष काढण्याकरिता महत्वाचे असते.
संशोधन प्रकारात संशोधन विषयाच्या स्वरूपावर साधन निश्चित करण्याची आवश्यकता भासत असते. संशोधनाचा प्रमुख आधार असलेल्या माहिती जमा करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला संशोधन साधन असे म्हणतात.
संशोधनाची विविध साधने पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते.
निरीक्षण
मुलाखत
प्रश्नावली
अभिवृत्ती मापिका
शोधिका
पडताळ सूची
पद्निश्चयनश्रेणी
अंकपत्र
प्रमाणित चाचण्या
समाजमिती
प्रक्षेपण तंत्रे
संशोधनात उपयोगात आणण्याकरिता विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत.परंतु संशोधन विषयाचे स्वरूप, उद्धीष्ट्ये व गृहीतके यावर आधारित साधनांची निवड करावी लागत
प्रश्नावली
प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची यादी किंवा प्रश्नांची मालिका असा सरळ अर्थ घेता येईल. प्रश्नावलीत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे हि प्रतीसाद्काला (माहिती देणारा ) स्वतः भरून द्यावी लागतात. यात संशोधक विशिष्ट नमुन्यात छापील स्वरुपात प्रश्नावली प्रतीसादकाकडे पाठवितो. हि प्रश्नावली प्रतीसादकाने भरून द्यावयाची असते. ह्या प्रश्नावलीत संशोधक संशोधन विषयासंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारतो. हे प्रश्न समजून घेऊन प्रतिसादक उत्तरे देत असतो.
अन्वेषक स्वतः च्या उपस्थितीत प्रश्नावली भरून घेत असेल तर त्याला अनुसूची म्हणतात.प्रश्नसंच वैयक्तिकरित्या पाठवून माहिती मागितली गेल्यास त्याला प्रश्नावली म्हणून संबोधले जाते.
संशोधन म्हणजे काय प्रस्तावना?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.