'अमेरिकन मार्केटिंग' असोसिएशन'ने केलेल्या व्याख्येनुसार विपणन संशोधनात वस्तू किंवा सेवा यांच्या वितरणासंबंधीच्या प्रश्नांविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती गोळा करणे, तिची नोंद करणे व विश्लेषण करणे या गोष्टींचा समावेश होतो.