वैज्ञानिक संशोधन : अनुभवाला आलेल्या घडामोडींचा खुलासा मिळविण्याची जिज्ञासा मनुष्याला स्वाभाविकच असते. उदा., शेजारच्या घरातील मूल रडले, तरी आपणास त्याचे कारण हवे असते व 'त्याला चॉकलेट हवे होते, पण त्याचे दात खराब असल्याने ते दिले नाही', हे समजले की आपण समाधान पावतो. हे एक संशोधनच आहे.