कंपनीच्या अगर संस्थेच्या संचालक किंवा कार्यकारी मंडळाने ठरविलेले धोरण व घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी करण्याचे काम सचिवाला करावे लागते. व्यवसायात पत्रव्यवहार पाहणारा, सभांच्या सूचना पाठविणारा, त्यांचे इतिवृत्त नोंदविणारा, कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा व दैनंदिन प्रशासन पाहणारा अधिकारी म्हणजे सचिव.