सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्याच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. नकारात्मक स्वातंत्र्य सर्वच व्यक्तींना उपलब्ध असते.

सकारात्मक स्वातंत्र्यनुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीनेेे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. रूसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे.कारण त्यांच्या मते,नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामुहिक इच्छांचा ही स्वीकार केला. राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जीचे प्रतिनिधीत्व शासनसंस्था करते, म्हणूनच ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात. म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत या विचारांचे रुसो समर्थन करतात.