समाज कसा चालतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यक्ति-व्यक्तींत, व्यक्ति-समूहांत आणि समूह-समूहांत स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्याची एक व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतरच त्याला समाज म्हटले जाते. समाजाला स्वत:ची अशी संरचना असते. त्याला सातत्य असते. भौतिक वस्तूंमधील संबंधांहून सामाजिक संबंध अगदी निराळे असतात.