समीक्षकाची भूमिका आस्वादकाची असली पाहिजे. प्रत्येक साहित्यकृती ही एक स्वतंत्र व अनन्यसाधारण अशी निर्मिती असते. तिची स्वत:चीअशी काही वैशिष्ट्ये असतात. समीक्षकाने त्यांचे ग्रहण करुन त्यांचाआस्वाद घ्यावयाचा असतो.