कार्बन असलेले काही साधे संयुगे अनेकदा अजैविक-पदार्थ देखील मानले जातात, उदाहरणार्थ: कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बोनेट, सायनाइड्स, सायनेट्स, कार्बाइड्स आणि थायोसायनेट. वाळू देखील अजैविक मानली जाते .पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.