महाविकास आघाडी ही २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली राज्यस्तरीय राजकीय आघाडी आहे. महाविकास आघाडी मध्ये काॅंग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व काही अपक्ष आमदार सुद्धा आहेत.