सरपंच व उपसरपंच मानधन/पगार २०२१
दिनांक १ जुलै, २०१९ पासून राज्यातील सरपंचाच्या मानधनात वाढ केली. तसेच, उपसरपंचानाही मानधन लागू केले. उपसरपंचाना यापूर्वी मानधन दिले जात नव्हते.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंच यांना खालीलप्रमाणे मानधन/पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (संदर्भ: शासन निर्णय क्र. व्हीपीएम २०१९/प्र.क. २५५ /पंरा-३).
० ते २००० लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन
सरपंच दरमहा मानधन - ३०००/-
उपसरपंच दरमहा मानधन - १०००/-
शासन अनुदान टक्केवारी - ७५ %
सरपंच अनुदान रक्कम - २२५०/-
उपरपंच अनुदान रक्कम - ७५०/-
२००१ ते ८००० लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन
सरपंच दरमहा मानधन - ४०००/-
उपसरपंच दरमहा मानधन - १५००/-
शासन अनुदान टक्केवारी - ७५ %
सरपंच अनुदान रक्कम - ३०००/-
उपरपंच अनुदान रक्कम - ११२५/-
८००१ व जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन
सरपंच दरमहा मानधन - ५०००/-
उपसरपंच दरमहा मानधन - २०००/-
शासन अनुदान टक्केवारी - ७५ %
सरपंच अनुदान रक्कम - ३७५०/-
उपरपंच अनुदान रक्कम - १५००/-
टिप: सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलते. उर्वरित २५% मानधनाची रक्कम ग्रामपंचायत स्वनिधीतून (कर वसूलीतून) देते.
सरपंच पगार किती असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.