शेवटी मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूंनी निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य हळुहळू खिळखिळे होत गेले आणि मराठा साम्राज्य भारताच्या सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.