हे न्यायाधीश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नावांची शिफारस राष्ट्रपतींना करतात. निवडीची तरतूद काय? राज्यघटनेतील कलम १२४ आणि २१७नुसार देशाच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयातील आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करावी.