भागभांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचे एक प्रमुख वित्तीय साधन आहे. भागभांडवल हे संस्थेच्या मालकीचे भांडवल असते. भाग म्हणजे संस्थेच्या सभासदांचा एकूणभांडवलातील लहान हिस्सा किंवा अंश होय. सहकारी संस्था जेव्हा भागांची विक्री करून भांडवल जमा करते, तेव्हा त्यास भागभांडवल असे म्हणतात.