कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. याच प्रेरणेमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांच्या विरुद्घ दिशेने खंडांच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाह वाहतात.