जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान आणि श्रीमंत असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे जाऊन समाजाला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या समाज जीवनात संघटनेचे अनन्य साधारण असे महत्व आहे. जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जोडलेली असते त्या त्या व्यक्तींना लोक आपुलकीने ओळखतात.