सायबेरियाने रशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७७% भाग व्यापला आहे पण रशियाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त २५% लोकसंख्या सायबेरियामध्ये वसलेली आहे. सायबेरियाच्या पश्चिमेला उरल पर्वत, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला प्रशांत महासागर व दक्षिणेला कझाकस्तान, चीन व मंगोलिया हे देश आहेत.