साहित्य अकादमीची स्थापना ही १९५४ साली भारताच्या सांस्कृतिक खात्याने केली असून त्याचा उद्देश हा भारतात अभिजात साहित्याचा प्रचार करणे हा आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. १९५५ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.