इंदिरा गांधी कालवा हा मुळतः राजस्थान कालवा असे म्हटल्या जाते. हा भारतातील सर्वात लांब कालवा आहे. हा कालवा पंजाब येथे असलेल्या बियास आणि सतलज नदीच्या संगमापाशी बांधलेल्या हरीके येथील हरीके धरणापासून सुरू होतो आणि पुढे थार वाळवंटाच्या वायव्य दिशेला राजस्थान राज्यात वळून सिंचन सुविधा पुरवितो.