सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २०१९ सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. परंतु २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने १७ जागांवर विजय मिळवला व पक्षाचे अध्यक्ष प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री बनले.