मंडळात जे पूर्णवेळ संचालक असतात त्यापैकी एकाला संचालक मंडळाचे निर्णय अंमलांत आणण्याची जबाबदारी दिलेली असते त्याला एमडी म्हणतात. संचालक मंडळाच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी जो संचालक असतो त्याला चेअरमन म्हणतात. जर संचालकांच्या बैठकीत एकमेकाविरूद्ध दोन भाग असले व ते संख्येने सारखे असले तर चेअरमन आपले निर्णायक मत देतो.