सूर्यामध्ये कोणते घटक आढळतात?
✅ Updated recently
सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. सूर्याचे सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. सूर्याच्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो.