सोलापूर जिल्ह्यात किती भाषा बोलल्या जातात व कोणत्या?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह (हेल काढून) बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चारशैलीवर प्रामुख्याने धनगर भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा सर्व भाषांत सहजतेने बोलताना आढळतात.