चैतन्यशीलता, महत्त्वाकांक्षी स्वभाव, कार्यक्षमता इ. व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वांच्या घटकांचा स्थलांतराच्या प्रमाणावर तसेच पद्धतीवर निश्चित परिणाम होतो. (५) परस्पर समाजांतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व भाषिक ओढ तसेच भावनिक बांधिलकी यांचा स्थलांतरावर अनुकूल परिणाम होतो.