इतरांवर अवलंबून न राहता सहकार्याने स्थानिक समस्या सोडवणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्दिष्ट आहे. स्थानिक लोकांनाच त्यांच्या समस्या माहित आहेत आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी स्थानिक लोकच रस घेतात. ते कामही वेगाने आणि कमीत कमी खर्चात पूर्ण करतात.