स्फोटक दाब म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्फोट ही रासायनिक विक्रिया किंवा अवस्थेतील फेरबदल असून तो अगदी अत्यल्प काळात घडतो आणि त्याच्याबरोबर उच्च तापमान व सामान्यपणे मोठ्या प्रमाणात वायू निर्माण होतात. अशा प्रकारे स्फोटात द्रव्याच्या मूळ व्यापाचे ( घनफळाचे ) अचानकपणे पुष्कळच अधिक मोठ्या व्यापात प्रसरण होते किंवा सीमित द्रव्याने दिलेला दाब अचानकपणे खूप वाढतो.