स्वयंनिर्देशित अध्ययन ही पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असणारी एक विद्यार्थीकेंद्रित वैयक्तिक अभ्यासपद्धती किंवा अध्ययनपद्धत आहे. स्वयंनिर्देशित अध्ययन हे प्रौढ अध्ययनाला प्रेरणा देणारी अध्ययन पद्धती आहे. ज्यामध्ये मार्गदर्शन, अध्ययन आणि नियोजन यांची पूर्णतः जबाबदारी अध्ययनार्थीची असल्याचे गृहीत धरले जाते.
स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या प्रक्रिया :
(१) शिकणारी व्यक्ती अस्वस्थ होते. उदा., मी अभ्यास करूनसुद्धा नापास कसा झालो? किंवा अध्ययन केलेले मला का समजत नाही, असा वैचारिक संघर्ष होतो. काही वेळेस दोषारोप दुसऱ्यांवर केले जाते.
(२) स्वतःच्या समस्या नेमकेपणाने मांडण्यासाठी दुसऱ्यांची स्वपरीक्षणासाठी मदत घेतली जाते; ‘स्वजबाबदारीची’ जाणीव होते.
(३) स्वजबाबदारीच्या जाणीवेनंतर स्वतःच्या समस्येसंदर्भात नवीन माहिती, नवीन ज्ञान मिळविले जाते. काही मूळ गृहीतके पूर्णपणे कोलमडून जातात. या प्रक्रियेत अध्ययनार्थी हळूहळू स्वअध्ययनाची जबाबदारी स्वतःवरच घेतो आणि शेवटच्या अवस्थेत स्वतःच स्वतःच्या निर्देशानुसार अभ्यास करायचा, अशा वयक्तिक जबाबदारीकडे जातो. या प्रक्रियेमुळे अध्ययनार्थीमध्ये काही बदल होतात. उदा., अध्ययनाविषयी प्रेम व अंगी सर्जनशीलता असते; अध्ययनाच्या मुलभूत कौशल्यांची व समस्या निराकरणाच्या कौशल्यांचा वापर करण्याची क्षमता असते; ‘स्व’ अंत:प्रेरणेने प्रेरित होतो; ‘स्व’चे अस्तित्व टिकविण्याची गरज व जिज्ञासा त्यांच्यात निर्माण होते; विविध अध्ययनशैली आणि अनुभवांवरील विविध भूमिका शिकायला तयार असतो; अध्ययनाची संधी शिकविण्यास सतत तयार असते; क्रियाशील अध्ययनार्थी अध्ययनाबाबतीत स्वतःच जबाबदार असतो; प्राथमिक जबाबदारी ही व्यक्तिगत अध्ययनाची असते इत्यादी वैशिष्ट्ये अंगीकृत करणारा स्वयंनिर्देशित अध्ययनार्थी होय. स्वयंनिर्देशित अध्ययनात विविध कृतींचा समावेश असतो. त्या विशिष्ट क्रमाने पायऱ्या पायऱ्यांनी होतात व प्रत्येक पायऱ्यानुसार कृतीचे नियोजन करावे लागते.
स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या पायऱ्या : स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या सहा पायऱ्या आहेत.
(१) स्वयंप्रेरणा (सेल्फ मोटिव्हेशन) : अध्ययनार्थीला अध्ययनाची सुरुवात स्वयंप्रेरणेनुसारच करावी लागते. स्वयंप्रेरणा नसेल, तर त्याला शिकण्याची इच्छाच राहणार नाही आणि त्यामुळे अध्ययनार्थी अस्वस्थ होतो. उदा., एकलव्य धनुर्विद्या शिकण्यापूर्वी अस्वस्थ झाला होता; मात्र नंतर स्वयंप्रेरणेने पुढील अध्ययनाची दिशा शोधली.
(२) गरजांची निश्चिती (आयडेंटिफिकेशन ऑफ नीड्स) : स्वअवस्थेतून अध्ययनाच्या गरजा स्पष्ट होऊ लागतात. अध्ययनासाठीच्या विविध गरजा निर्माण झाल्यामुळे त्या गरजांची नेमकी निश्चिती अध्ययनार्थीला करावी लागते. त्यानंतर या गरजांचा तो प्राधान्यक्रम ठरवितो व पुढील अध्ययनाविषयीच्या कृतीकडे वळतो. हीच निश्चिती त्याची शिकण्यामागची स्वतःची वेगळी ध्येये किंवा उद्दिष्टे निर्माण करते.
(३) ध्येय, हेतू व उद्दिष्टे यांची निश्चिती (आयडेंटिफिकेशन ऑफ गोल्स, एम्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह्ज) : ध्येय, हेतू व उद्दिष्टे या तीन संकल्पना वरवर पाहता सारख्याच वाटतात; परंतु यांत सूक्ष्म भेद आहेत; त्यांच्या व्याप्तीत फरक आहे. ध्येय हे व्यापक असते. त्यानंतर हेतू कमी व्यापक व त्यानुसार उद्दिष्टे येतात. अध्ययनार्थी आपली ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करतो आणि त्यानुसार विविध ज्ञान व कौशल्ये आत्मसात करतो. त्यात सराव, निरीक्षण यांसारख्या कृतींचाही समावेश होतो. अर्थात यासाठी त्याला विविध स्रोतांचा शोध घेणे अपरिहार्य ठरते.
(४) स्रोतांचा शोध (सर्चिंग ऑफ सोर्सेस) : अध्ययनाच्या विविध स्रोतांमध्ये तज्ज्ञ, मार्गदर्शन, संदर्भ पुस्तके, माहिती, सुविधा, साधने, संगणक, व्याख्याने, आंतरजाल इत्यादींचा समावेश होतो. अध्ययनार्थी स्वतःच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी या स्रोतांचा आवश्यकतेनुसार शोध घेतो आणि अध्ययनाची प्रक्रिया अखंडपणे चालू ठेवतो.
(५) कृतीचे नियोजन (प्लॅनिंग ऑफ ॲक्टिविटीज) : कृतीचे नियोजन स्रोतांच्या शोधानुसार केले जाते. कृती अनेक असू शकतात. अभ्यासाची जागा शोधणे, वेळापत्रक तयार करणे, वाचन करणे, टिप्पणे काढणे, प्रयोग करणे, निरीक्षणे करणे, माहिती मिळविणे यांसारख्या अनेक कृती अभ्यासात येतात. अध्ययनार्थीला सर्व कृतींच्या नियोजनाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार स्वयंनिर्देशित अध्ययनाकडे तो पुढील वाटचाल करतो.
(६) स्वयंनिर्देशित अध्ययन (सेल्फ-डायरेक्टेड लर्निंग) : स्वयंनिर्देशित अध्ययनाची ही शेवटची पायरी आहे. ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही करणे, येथे अभिप्रेत आहे. यातून अध्ययनार्थीमध्ये स्वयंनिर्देशित अध्ययनार्थीची विविध वैशिष्ट्ये विकसित होतात.
स्वयंनिर्देशित अध्ययनाच्या मर्यादा :
स्वयंनिर्देशित अध्ययन कौशल्ये शिकण्यासाठी उपयुक्त ठरत नाही.
ज्या व्यक्तींना अध्यनासाठी बाह्य प्रबलाची आवश्यकता असते, अशांसाठी मर्यादा येतात.
निम्नस्तरावरील प्रेरणा असणाऱ्यांसाठी हे अध्ययन उपयुक्त ठरत नाही.
स्वयंशिस्त नसेल, तर स्वयंनिर्देशन अध्ययन शक्य होत नाही.
स्वयंनिर्देशन अध्ययन हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे.
स्वयंनिर्देशित अध्ययनाची कौशल्ये जर नसतील, तर व्यक्तीमध्ये स्वयंनिर्देशित अध्ययन होत नाही.
या अध्ययनात सहाध्यायी, सहकार्यशील अध्ययन होत नाही. (८) सामाजीक अडथळे निर्माण होतात इत्यादी.
स्वयं अध्ययन साहित्य म्हणजे काय?
✅ Updated recently