शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाबाई यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपवली आणि त्यांना पुण्याला पाठवून दिले. जहागिरीची व्यवस्था प्रत्यक्ष दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नेमलेले काही विश्वासू सरदार बघायचे.