हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत.