वेदप्रकाश हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे पहिले हुतात्मा, ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला. हैदराबाद संस्थानातील जनआंदोलन तीव्र होण्यास ही घटना खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली. नागदिव्याच्या सणाच्या आदल्या दिवशी वेदप्रकाश यांनी बलिदान दिले.