कर्जाची प्रक्रिया home loan process

बँकेची निवड - 

गृह कर्ज किंवा होम लोन घेण्यासाठी आपल्याला योग्य बँकेची निवड करावी लागते .यामध्ये सरकारी बँक ,खाजगी बँक ,फायनान्स कंपन्या व इतर अनेक पर्याय आहेत ,शक्यतो सरकारी बँक हा चांगला पर्याय आहे. सरकारी बँके तुन घरासाठी कर्ज मिळने थोडं अवघड काम असत पण तिथला व्याज दर कमी असतो ,सरकारी योजना व अनेक फायदे सुद्धा असतात. 

कर्जाची माहिती 

बँकेची निवड केल्यानंतर बँकेत जाऊन कर्जाची संपूर्ण माहिती घ्या . कर्जाची रक्कम ,तिची परतफेड पद्धत , व्याजदर ,सरकारी योजनांचा लाभ , बँकेचे नियम व इतर महत्वाची माहिती घ्या . 

कर्जासाठी अर्ज 

बँकेकडून कर्जासाठी दिलेला फ़ॉर्म भरावा लागतो. 


कागदपत्रे 

ओळखीचा पुरावा ,उत्पनाचा पुरावा व इतर अनेक कागतपत्रे आपल्याला जमा करावी लागतात.आपल्या उत्पनाचा विचार करून बँक कर्ज देत असते

बँकेकडून तपासणी 

संपूर्ण कागदपत्र जमा झाल्यानंतर बँक त्याची तपासणी करते बांधकामाच्या ठिकाणी भेट देते त्याची खात्री करून घेते. आपल्या उत्पानांची तपासणीने करते आणि त्यानंतर कर्ज द्यायचं कि नाही हे ठरवलं जात. 

कर्ज मंजुरी 

जर आपण कर्ज मिळण्यास पात्र असेल त्यानंतर बँक आपल्या कर्जास मंजुरी देते. 

कर्जाची रक्कम मिळणे 

वेगवेगळ्या  पद्धतीने कर्जाची रक्कम आपल्याला दिली जाते.. 
नवीन फ्लॅट च्या बाबतीत बँक कर्जाची रक्कम हि बिल्डर किंवा कंस्ट्रक्शन कंपनीच्या अकाउंट ला जमा करते . 

कर्जाची परतफेड 

प्रत्येक महिन्याला हप्ता भरून आपण ५ वर्ष ते ३० वर्ष या मुदतीत कर्जाची परतफेड करू शकतो. आधीमधी जास्त रक्क्कम भरून कर्जाची मुद्दल कमी करता येते. किंवा कालावधी समाप्त होण्याच्या आत कर्जाची परतफेड करता येते . पण यासाठी बँकेचे काही वेगवेगळे नियम असतात