गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सोनिया गोकानी यांनी गुरुवारी (२३ फेब्रुवारी) निरीक्षण केले की न्यायाधीश पुरुष असो की महिला असो, न्यायाधीशाला ‘सर’ असे संबोधले जावे, असे लाइव्ह लॉने वृत्त दिले आहे. एका वकिलाने खंडपीठाला वारंवार ' युअर लेडीशिप ' असे संबोधित केल्यानंतर सरन्यायाधीश गोकाणी यांनी ही टिप्पणी केली.