भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार :
आधुनिक काळातील अर्थव्यवस्थांचे स्थूलमानाने चार प्रकार पडतात.
मुक्त वा अनिर्बंध,
फॅसिस्ट,
समाजवादी ध्येयाची संमिश्र अर्थव्यवस्था व
साम्यवादी अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्थेची कार्ये
कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या उपयुक्ततेचा किंवा कार्यक्षमतेचा विचार करताना पुढील कार्ये त्या अर्थव्यवस्थेत कशी होतात, याचा विचार करणे आवश्यक असते :
(१) कोणत्या वस्तूंचे किती उत्पादन करावयाचे, ह्याचा निर्णय घेणे; उपलब्ध साधनसामग्रीचा उत्पादनकार्यात योग्य वापर करणे म्हणजेच उत्पादनसाधनांचा अपव्यय टाळणे, तसेच उत्पादनाचा व्याप उपभोगाशी संतुलित करणे.
(२) उत्पादन-खर्चात जास्तीत जास्त काटकसर करता येईल, अशा पद्धतीने उत्पादन-घटकांचे संघटन करणे.
(३) राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायांनुसार वाटप करणे.
(४) भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे─ह्याकरिता नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन, भांडवल-निर्मिती, भांडवलाची गुंतवणूक आणि शास्त्रीय शोध व तंत्रज्ञान ह्यांचा उपयोग करून उत्पादनपद्धतींत सातत्याने सुधारणा करणे.
२ भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.