प्रश्नांची यादी

1957 च्या स्त्रीशिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? open

दुर्गाबाई देशमुख (जुलै १५, १९०९ - मे ९, १९८१) ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व बँकेचे तिसरे गर्व्हनर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्त मंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते. त्या भारतीय संविधान सभेच्या सदस्या होत्या. तसेच भारतीय नियोजन आयोगाच्यासुद्धा सदस्या होत्या.

पूर्ण वाचा →

भारत सरकारने वृत्तपत्र चौकशी आयोगाची स्थापना कधी केली? open

स. राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली २२ सप्टेंबर १९५२ रोजी पहिल्या वृत्त्पत्र आयोगाची स्थापना करण्यात आली.

पूर्ण वाचा →

महिला आयोगाचे काम काय? open

राष्ट्रीय महिला आयोगाचा उद्देश देशातील महिलांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि चिंता यांना आवाज देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा आहे. यात कौटुंबिक, राजकीय, धार्मिक आणि नोकरी संदर्भात महिलांच्या मुद्द्यावर जागरुकता निर्माण करतं. हिंसा आणि बलात्कार पीडित महिलांना न्याय आणि पुनर्वसनासाठी काम करतं

पूर्ण वाचा →