प्रश्नांची यादी

वनस्पतीचे प्रकार किती व कोणते? open

ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणाऱ्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत.

पूर्ण वाचा →

ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? open

इ. स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंडळात एकूण किती सदस्य? open

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर (जिल्हा मंच) एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतात. जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल, अशी व्यक्ती मंचाच्या अध्यक्षपदी नियुक्त केली जाते.

पूर्ण वाचा →

कर्ज देणे म्हणजे काय ते कर्जाची तत्त्वे स्पष्ट करतात? open

व्याख्या स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात. कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात..

पूर्ण वाचा →

परिव्यय म्हणजे काय? open

परिव्यय: विशिष्ट परिमाणात एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटकांवर करावा लागणारा खर्च. उत्पादनाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिव्ययाविषयीची माहिती व्यवस्थापकांना अनेक प्रकारे उपयोगी पडते. आपल्या उत्पादनाच्या योजना अंमलात आणताना कर्मचा-यांचे संचालन करण्याकरिता त्यांना परिव्ययामाहितीचा आधार घेता येतो.

पूर्ण वाचा →