इंदिरा गांधींची व्यावहारिक राजकारणावर असलेली पकड आणि सोबतच पूर्व पाकिस्तानी लोकांच्या दुःखाबद्दल असलेली सहानुभूती या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. आणि शेवटी हे युद्ध न्यायसंगत युद्ध ठरलं. 1971 च्या या युद्धात जे यश मिळालं त्याचं श्रेय युद्ध-योजनेला दिलं जातं.