अग्निपथ योजना नेमकी काय आहे?
अग्निपथ योजना: भारतीय सैन्यात 4 वर्षं सेवा करा, समजून घ्या ही योजना 7 मुद्द्यांत भारतातील तरुणांना आता चार वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची 'अग्निपथ योजना' जाहीर केली. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना 'अग्निवीर' म्हटलं जाणार आहे.
अग्निपथ योजनेचं वैशिष्ट्य -
भरती होण्यासाठी वय 17 ते 21 वर्षांदरम्यान असावं लागेल.
शैक्षणिक योग्यता 10वी किंवा 12वी पास
भरती चार वर्षांसाठी असेल.
चार वर्षांच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारावर मूल्यांकन केलं जाईल.
भरती केलेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाईल.
अग्निपथ योजना नेमकी काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.