अभ्यासक्रमहे साधन असून शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि त्यानुसार ठरविलेले उद्दिष्ट हि साध्ये असतात. त्यामुळे साध्य प्राप्त करायचे असल्यास अभ्यासक्रमात काळानुरूप सातत्याने बदल म्हणजेच विकसन अथवा अद्ययावतीकरण करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना काय व केव्हा शिकवायचे, हे ठरविण्यासाठी अभ्यासक्रम वापरला जातो.