अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी. ' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. संसदीय शासनपद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो. ‘पार्लमेंट’ ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी (Parliamentary) शासनपद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते.
भारतात ही शासनपद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण स्वीकारलेली अाहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासनपद्धती व भारतातील संसदीय शासनपद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते. परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे.
अमेरिकेत संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आहे का?
✅ Updated recently