अर्थविचार :

मानवी भाषेचे अंतिम उद्दिष्ट अर्थ व्यक्त करणे हे असून अर्थाच्या पातळींवर अभ्यास वर्णनात्मक भाषाशास्त्रात केला जातो.

या अर्थाचे पुढील प्रकार आहेत.
१. सांकल्पनिक अर्थ २. सहचारी अथवा साहचर्यपर अर्थ ३. शैलिगत अर्थ ४. भावपर अर्थ ५. परावर्तीत अर्थ ६. साहचर्यपर अर्थ ७. विषय अर्थ

*सांकल्पनिक अर्थ

शब्दांचा मूळ गाभा किंवा मूळ अर्थ असतो, त्याला सांकल्पनिक अर्थ असे म्हणतात.

उदा. ‘पुरुष’, ‘स्त्री’ व ‘मूल’ या शब्दांचे सांकल्पनिक अर्थ असे आहेत: पुरुष = [+प्रौढ ] [+नर ] [-मादी ] [+विवाहित] [+अविवाहित ] [-पशू ] स्त्री = [+प्रौढ ] [-नर ] [+मादी ] [+विवाहित] [+अविवाहित ] [-पशू ] मूल = [-प्रौढ ] [+नर ] [-मादी ] [+मादी] [-विवाहित] [+अविवाहित ] [-पशू ]

*सहचारी अथवा साहचर्यपर अर्थ

मूळ सांकल्पनिक शब्दार्थांना प्रत्यक्ष संवादात वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्या अर्थाला सहचारी अर्थ असे म्हणतात. उदा. ‘बाई’, ‘नार’, ‘पत्नी’ हे शब्द ‘स्त्री’ या शब्दाचे संकल्पनिक अर्थ आहेत, तरी त्यांचे सहचारी अर्थ वेगवेगळे आहेत.

*शैलिगत अर्थ

भाषेचा अर्थव्यापार वेगवेगळ्या परिस्थितीच्या संदर्भाने निश्चित झालेला असतो. अशा वेगवेगळ्या संदर्भांनी सीमित होणाऱ्या किंवा प्रकटणाऱ्या अर्थाला शैलिगत अर्थ असे म्हणतात. उदा. ठावठिकाणा, मुक्क्कम, वास्तव्य या शब्दांचे सांकल्पनिक अर्थ एकच आहेत. परंतु ते वापरण्याचे संदर्भ भिन्न भिन्न असतात.

*भावपर अर्थ

वाक्यात अनेकदा शब्द आणि वाक्ये यांच्यावर आघात करून किंवा सुरावली वापरून संवादाची परिणामकारकता वाढवली जाते. त्यामुळे मूळ शब्दाचे अर्थ बदतात. अशा अर्थाना भावपर अर्थ असे म्हणतात

*परावर्तीत अर्थ

वक्ता जो शब्द बोलत असतो त्याचा अर्थ ऐकणारा दुसराच घेत असतो, त्याला परावर्तित अर्थ असे म्हणतात. उदा. ‘माल’ या शब्दांचा शिक्षकाचा सामान असा अर्थ विद्यार्थी दुसराच घेतात. सहचारी अर्थ एकमेकांना जोडून येणाऱ्या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या अर्थाला सहचारी अर्थ असे म्हणतात. उदा. दुख:द निधन, साष्टांग नमस्कार, लोभ असावा इ.

*विषय अर्थ

वाक्यातील उद्देश आणि विधेय यांच्या मांडणीत बदल केल्यास वाक्याचा मूळ अर्थ बदलून त्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो, त्याला विषय अर्थ म्हणतात. उदा. ‘शिक्षक आले आणि मुले बाहेर पडली’ या वाक्याचे उद्देश आणि विधेय बदलले की अर्थ बदलतो. उदा. ‘मुले बाहेर पडली आणि शिक्षक आले अशाप्रकारे वर्णनात्मक भाषाविज्ञानात स्वनिमविचार, पदिमविचार, वाक्यविचार आणि अर्थविचार या पातळ्यांवर वर्णनात्मक भाषाविज्ञानात भाषेचा अभ्यास केल्या जातो.