२ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. प्रारंभी काही काळ हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी होती. नंतर अमरावती या सुनियोजित राजधानीची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसविली.