अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण यांची मंदिरे आहेत. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे.