अमृत महोत्सव : भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.