स्वातंत्र्य अमृत महोत्सव म्हणजे काय?

एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केला.

वर्ष व महोत्सव :

२५ वर्षे - रौप्य महोत्सव
५० वर्षे - सुवर्ण महोत्सव
६० वर्षे - हीरक महोस्तव
७५ वर्षे - अमृत महोत्सव
१०० वर्षे - शतक महोत्सव