सध्या ऊर्जेचा वापर स्वयंपाकासाठी,दिवाबत्तीसाठी, आणि शेतीच्या इतर कामांसाठी केला जातो. एकूण ऊर्जेच्या मागणीपैकी ७५ % ऊर्जा, स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी वापरली जाते. ग्रामीण घरांमधे, विजेबरोबरच, परिसरात उपलब्ध असलेली झाडेझुडुपे आणि केरोसीन हयांचाही वापर ऊर्जा मिळवण्यासाठी होतो.