आर्थिक स्वतंत्रता म्हणजे लखपती, करोडपती असणं.भारतात अजूनही आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना तंतोतंत अस्तित्वात आली आहे असे म्हणता येत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यात आघाडीवर राहिलेल्या भारतासारख्या देशात ही गोष्ट घडू नये ही अधिकच खंतावणारी बाब आहे. राजकीय लोकशाही आपल्याला समजते पण आर्थिक लोकशाही समजत नाही. माझ्या जडणघडणीच्या काळात मी समाजवादी विचारसरणीशी सख्य बाळगले होते; पण नंतर मी मुक्त, उदार व स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला.