आवर्त पर्जन्य म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आवर्तातील हवा वेगाने वर जात असते. हवा वर जात असताना उत्तरोत्तर तिचे तापमान कमी होऊन ती बाष्पसंपृक्त बनत जाते. बाष्पसंपृक्त हवेचे संद्रवण किंवा संघनन (बाष्पकणांचे जलकणांत रूपांतर होण्याची प्रक्रिया) होऊन मेघनिर्मिती होते आणि अनुकूल परिस्थितीत पाऊस पडू लागतो. या पर्जन्यास 'आवर्त पर्जन्य' असे संबोधले जाते.