पश्चिम महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी. कोकणात भात काढल्यानंतर रान तयार करून पेरणी करावी. कारण तिथे थंडी कमी असते तर विदर्भ मराठवाड्यात मार्चपर्यंत पेरणी करावी. उन्हाळी भुईमुगाची पेरणी जमीन ओलवून वाफशावर आल्यानंतर दोन चाड्याच्या पाभरीने करावी.