उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन म्हणजे काय?

इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो . (१) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.

उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन"एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.