औद्योगिक कायदे : उद्योग चालविणाऱ्‍या संस्था कशा स्थापन करावयाच्या व त्यांनी आपला कारभार कोणत्या पद्धतीने चालवायचा त्याबद्दलचे हे कायदे आहेत. याखेरीज उद्योग कसे व कुठे सुरू करावेत, भांडवल कसे उभारावे, परदेशी भांडवलाची किंवा तंत्रज्ञानाची मदत कशी व कितपत घ्यावी वगैरे गोष्टींबद्दलही काही कायदे आहेत.