जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.